Monday, 12 April 2021
भिती न बाळगता लस घ्या - सुनील केदार
नागपूर,दि. 12: कोविड प्रतिबंधासाठी लस घेतल्याने कोणताही त्रास होत नाही, मनात कसलीही भिती न बाळगता लस घ्या व लसीकरण मोहिमेस सहकार्य करा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. त्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस आज शहरातील मेडिकल कॉलेज लसीकरण केंद्रात घेतला. त्यांच्यासह सौ. अनुजा केदार यांनीही लस घेतली. श्री. केदार यांनी यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यावेळी उपस्थित होते.
दुरगामी परिणामापासून वाचायचे असेल तर लसीकरण नक्कीच करा. स्वयंप्रेरणेचे लसीकरण करुन दुसऱ्याला प्रेरित करा. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे, असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. शासनाने केलेल्या वेगवेगळया उपाययोजना, निर्बंध व नियमांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लसीकरण मोहिमेत मोठया संख्येने सहभागी होऊन स्वत:चे व समाजाचे कोविडपासून रक्षण करा, असेही ते म्हणाले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment