Wednesday, 30 June 2021
उमरेड येथील आठही रुग्ण दुसऱ्या लाटेतील
उमरेड येथील कोरोना बाधित असलेल्या आठही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून कोरोना बाधित रुग्ण दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व रुग्ण नवीन स्ट्रेन ‘डेल्टा प्लस’ नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.
उमरेड येथे आठ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात आली होती. त्यानुसार त्यांचे कोरोनासंदर्भातील नमुने नीरी संस्थेमार्फत राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या संपूर्ण रुग्णांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून दुसऱ्या लाटेतील डेल्टा प्रकारचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवीन स्ट्रेनमधील डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण नाहीत, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment