Tuesday, 20 July 2021
इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी
नागपूर, दि. 20: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा आयोजन शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि. 26 जुलैपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment