Friday, 13 August 2021
भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन
पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण
नागपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण होईल. त्यानंतर ते सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारतील.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन मुख्य सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment