Wednesday, 2 March 2022
उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती
नागपूर, दि. 2: मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक(इयत्ता 12 वी) तसेच माध्यमिक शालान्त (इयत्ता 10 वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्य माध्यमिक मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा शुक्रवार, दिनांक 4 मार्च पासून तर इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून घेण्यात येणार आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक तणावाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
8432592358, 7249005260, 7387400970, 9307567630, 8975478247, 7822094261, 9579159106, 9923042268, 7498119156, 8956966152 या भ्रमणध्वनीद्वारे परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत समुपदेशक विद्यार्थ्यांना नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र, विद्यार्थी, पालकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधी प्रश्न समुपदेशकांना विचारता येणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment