Wednesday, 11 October 2023
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विभागातील कर्मचाऱ्यांप्रती सहृदयता पोलीस कर्मचाऱ्याचा साजरा केला वाढदिवस
नागपूर, दि.9 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांचा वाढदिवस असल्याचे कळतात कामाच्या व्यस्ततेतूनही श्री. फडणवीस यांनी या दोन्ही अंमलदारांना शुभेच्छा दिल्या व केक भरवला.
हा सर्व अनुभव घेणारे दोन पोलीस अंमलदार आणि त्यांचे सर्व वरिष्ठ हा अनपेक्षित आनंद डोळ्यात भरून घेताना आपल्या विभागाचे प्रमुख तथा राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करतात हे पाहून सुखावले.
सदर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार धिरज पंचभावे आणि अरविंद गेडेकर यांचा आज वाढदिवस असल्याची माहिती गृहमंत्र्यांच्या कानावर पडली आणि त्यांनी या दोन्ही अंमलदारांना आपल्या दालनात बोलवून घेतले. या दोघांना शुभेच्छा दिल्या ,त्यांना केकही भरवला, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. हा अनपेक्षित आणि प्रेमळ हृद्यप्रसंगाचे साक्षी होणारे दोन्ही अंमलदार आयुष्यातला सर्वात मोठा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान व्यक्त करत आहेत.
झोन क्र. २ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सदर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस कर्मचारी यांच्या सोबत श्री. फडणवीस यांनी छायाचित्रही काढले.
या प्रसंगातून श्री. फडणवीस हे आपल्या विभागाच्या शेवटच्या घटकाप्रती प्रेम भाव बाळगतात आणि त्यांची काळजी घेतात हेच दिसून आले.
०००००
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment