Thursday, 2 November 2023
निवृत्तीवेतन धारकांना हयातीचे दाखल्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत
नागपूर दि. 2: कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले कोषागारात सादर करावयाचे आहेत. यासाठी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या संबंधित बँकेतील यादीत आपल्या नावासमोर स्वाक्षरी करुन आपला मोबाईल क्रमांक व पॅन क्रमांक तसेच आधार क्रमांक नमुद करावा.
ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेत त्यांनी आपल्या वयाचा पुरावा म्हणुन स्वत:चे आधार कार्ड,पॅन कार्ड तसेच पासबुकची छायांकित प्रत कोषागारात सादर करावी, जेणेकरुन त्यांना वाढीव निवृत्तीवेतन अदा करणे शक्य होईल. असे दाखले आपल्या अर्जासह दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत कोषागार कार्यालयात सादर करावेत, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी नागपूर यांनी कळविले आहे.
0000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment