Thursday, 7 December 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रासाठी 575 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

नागपूर, दि. 7: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम व 615 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी 575 कोटी 79 लक्ष 17 हजार 497 रुपयांच्या निधीस राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे प्रस्तावित काम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. 00000 --

No comments:

Post a Comment