Friday, 1 December 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आगमन मेडिकलचा अमृत महोत्सव व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी
नागपूर, दि.१ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आज दुपारी १२.२० ला आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment