नागपूर दि. 18 : जिल्हा कोषागार कार्यालय येथे ई – बिल, ई – व्हाउचर, ई - हस्ताक्षर कार्यप्रणालीचे उद्घाटन लेखा व कोषगार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वरिष्ठ कोषगार अधिकारी गिता नागर, बालकृष्ण नायर, महेश घोडके, गजानन हिरूळकर, मोनाली भोयर, दीपा देशपांडे, सहसंचालक ज्योती भोंडे, स्वप्नजा सिदंकर यांची उपस्थिती होती. ई-बिल, ई-व्हाउचर, ई- हस्ताक्षर कार्यप्रणालीमुळे आहरण व संवितरण अधिकारी यांना टेलिफोन, इलेक्ट्रीक बिल, पाणी बिल या बील पोर्टलच्या माध्यमातून कोषगार कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
या प्रणालीच्या सर्व आहरण व सवितरण अधिकारी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment