नागपूर, दि. 25: राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.
लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त नि:पक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलेाभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, धनंजय सुटे, तहसिलदार महेश सावंत, आर.के.डिघोळे, संध्या खोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*******
No comments:
Post a Comment