नागपूर दि. ३१
: माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक गणेश रामदासी हे नियत वयोमानानुसार
सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.
माहिती
संचालक कार्यालयात आयोजित निरोपसमारंभास माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक
पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह
संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती केंद्राचे कर्मचारी उपस्थित
होते.
माहिती
संचालक श्री. रामदासी हे वर्ष २००२ मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या दिल्ली स्थित
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक म्हणून रूजू झाले होते. यानंतर त्यांनी केंद्रीय
वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारीक अन्वर यांचे
अतिरीक्त स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून
वर्ष २०१८ मध्ये त्यांची पदोन्नती झाली. यानंतर
मुंबई येथे संचालक प्रशासन, संचालक वृत्त व जनसंपर्क पदाचा कार्यभार सांभाळला.
श्री. रामदासी यांची नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.
नियत वयोमानानुसार ते आज सेवानिवृत्त झाले आहेत.
गणेश
रामदासी आणि त्यांच्या पत्नी गायत्री रामदासी यांचे स्वागत करून भेट वस्तू देत निरोप
देण्यात आला. माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर काम करीत असतांना आलेले अनुभव
तसेच प्रसिद्धी विषयक कामाचा अनुभव श्री.रामदासी यांनी यावेळी कथन केला व सर्व अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी सकारात्मकदृष्टीकोण बाळगावा असेही त्यांनी सांगितले. श्री रामदासी
यांच्या दिल्लीतील वैविद्यपूर्ण कारकिर्दीवर रितेश भुयार यांनी प्रकाश टाकला, श्री.
गडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले.
00000
No comments:
Post a Comment