नागपूर, दि. ११: अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय
आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण परिसरातील क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट, एनआयटी स्केटिंग
रिंग भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची आज पाहणी केली.
समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त
डॉ.अभिजीत चौधरी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले. क्रेझी कॅसल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना
अंतर्गत महा मेट्रोने पुल तोडणे, नदी खोलीकरण-रुंदीकरण आदी केलेल्या कामांची माहिती
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. येथे ५०० मीटर परिसरात
नाग नदीवर स्थित सात पुल तोडण्यात आले असून आज आठवा पुल तोडण्यात येत आहे, याबाबतची
माहितीही देण्यात आली. येथील जुन्या वॉटर पार्क परिसरात नाग नदीच्या किनाऱ्यावर काँक्रीट
पिलर वर स्थित असलेली बोट व पिलर येत्या आठवड्याभरात काढण्यात येणार असल्याची माहिती
यावेळी देण्यात आली.
सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन
मेट्रो पिलर दरम्यान नाग नदी परिसरात पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार खोलीकरण व रुंदीकरणाचे
काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प)
राजीव त्यागी आणि संचालक (धोरणात्मक नियोजन) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.
श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी घाट
परिसरात मनपाकडून सुरु असलेल्या नाग नदी
रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. या भागात ४७ मिटर अंतरावर नदी किनाऱ्यापासून १७
मिटर पर्यंत नदी रुंदीकरण करण्यात आले आहे. उर्वरित रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर
असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. मनपा उपायुक्त प्रकाश वराडे,
मुख्य अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता गुरुबक्षानी आदी यावेळी उपस्थित
होते. एनआयटीच्या स्केटिंग रिंग
परिसरातील नाग नदी खोलीकरण-रुंदीकरणाच्या
कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.
तत्पूर्वी, सोमवार १० जून २०२४ रोजी श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी धरण
परिसरातील धरण बळकटीकरणाच्या कामांची पाहणी केली.
0000
No comments:
Post a Comment