नागपूर,दि. 31 : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडीट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य शासनाचे वर्ग-4 चे कर्मचारी वगळता प्रधान महालेखाकार (ले. व ह.)-2 कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील लेखे ठेवले जातात. अशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह लेख्यांचे वर्ष 2023-24 करिता वार्षिक विवरण या कार्यालयाच्या https://
प्रधान महालेखाकार कार्यालयामधून कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात भविष्य निर्वाह निधी लेख्यामध्ये जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रीम राशी, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम आहारणाच्या आवेदनाची प्राप्ती व प्राधिकृत होण्याबाबतचा मोबाईल संदेश प्राप्त होतो. त्यासाठी राज्य शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना प्रधान महालेखाकार कार्यालयात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसेल त्यांना fm.mh२.ae@cag.gov.in या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे संपूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक, व सेवार्थ आयडीसह पाठविण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.
भविष्य निर्वाह निधी विविरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व जन्मतारीख तपासून घेण्याचे व त्यात तफावत आढळ्यास सेवार्थ प्रणालीत सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्याद्वारे या कार्यालयास दुरुस्तीसह gpfpakrarngp@gmail.com वर पाठवावा असेही सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मासिक अभिदानाची राशी अथवा घेतलेल्या अग्रिम भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या माध्यामातून कोषागाराकडे पाठविण्याचेही सांगण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment