Friday, 23 August 2024
१०वी आणि १२वी पुरवणी परिक्षेसाठी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु
१०वी आणि १२वी पुरवणी परिक्षेसाठी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु
• २ सप्टेंबर पर्यंत करता येणार गुणपडताळणी अर्ज
नागपूर, दि. २३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी)करिता पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेऊन ५ दिवसांत अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
जुलै-ऑगस्ट २०२४ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागात झालेल्या इ.१० वी व इ. १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २३ ऑगस्टला जाहीर झालेला असून पुनर्मूल्यांकनासह, गुणपडताळणी व छायाप्रतीकरिता २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत नोंदणी फेब्रुवारी-मार्च २०२४ मधील इयत्ता १०वी, १२ वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्याची प्रक्रिया जुलै-ऑगस्ट २०२४, फेब्रुवारी-मार्च २०२५ व जुलै-ऑगस्ट२०२५ तर जुलै-ऑगस्ट २०२४च्या विद्यार्थ्यांकरिता फेब्रुवारी-मार्च २०२५, जुलै-ऑगस्ट २०२५ व फेब्रुवारी-मार्च २०२६ याप्रमाणे सुविधा उपलब्ध असतील.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी)च्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजेनेचे प्रविष्ट विद्यार्थी व इतर पात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे मंडळामार्फत स्वीकारण्यात येतील.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment