Wednesday, 7 August 2024
‘सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’
· मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
· अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर
नागपूर, दि.7: ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे (सारथी) यांच्यामार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रमासाठी’ ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांना ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’ २०२४-२५ प्रशिक्षण तुकडीकरिता अर्ज करता येणार आहे. ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ महिने कालावधीसाठी अनिवासी स्वरुपाचे हे नियमित प्रशिक्षण राहणार आहे.
या उपक्रमा संदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून लक्षित गटातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उप व्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment