नागपूर, दि. 30 : जिल्ह्यातील
सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँकामधुन निवृत्ती वेतन आरहित होते त्या
शाखेकडून जीवन प्रमाण प्रत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्याचे आवाहन, अपर कोषागारे (निवृत्त
वेतन) अधिकारी यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी
आप-आपल्या बँकाकडे पाठपुरावा करुन जीवन प्रमाणपत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्यासंदर्भातील
कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कोषागाराकडुन देण्यात आल्या आहेत. संबंधित
बँकांना यापूर्वीच कोषागाराकडून मुदत देण्यात आली होती. निवृत्तीवेतनधारकांनी जीवन
प्रमाणपत्राचे रजिस्टर प्रमाणित करुन कोषागारास सादर न केल्यास निवृत्तीवेतन अदा करण्यास
विलंब होऊ शकतो, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000000
No comments:
Post a Comment