![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQiQpxpnsNHkgKWzTpb-GYlxsNQVtYFgR1DG3Bbfw31RkVk2i0f4-pVEnaRmvr_kUTFyFonjjUYtbSd1HJmO0ga8zZcReuwcJTy_r0RI748gjmdwuWsCofNmkFOCS_A9XFLGCg7al8iG2OIwr-QbZFjKzPHA8rdcgAPmoUEkxUcvev3v9g3TjwSc5BpGo/s320/111.jpeg)
Ø
३१ जानेवारी पर्यंत मानकापूर क्रीडा
संकुल येथे आयोजन
नागपूर, दि.
२९ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय
महसूल व सांस्कृतिक स्पर्धेचे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी
यांच्या हस्ते मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरातील मैदानावर थाटात उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची
भेट घेवून संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी जिल्ह्यातील महसूल विभागातील
अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वर्ष
२०२४-२५ च्या स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. अपर जिल्हाधिकारी
तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण
महिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. महामुनी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून
तसेच हवेत फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यानंतर स्पर्धेत सहभागी संघांचे पथसंचलन
झाले. मान्यवरांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन
केले.
उपविभागीय कार्यालय मौदा, सावनेर, उमरेड, काटोल, रामटेक
यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय
नागपूर ग्रामीण असे एकूण आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. कोतवाल, तलाठी,
महसूल सहायकापासून अधिकारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
श्री.महामुनी यांनी पुरूषांच्या ४५ वर्षा खालील गटात १०० मिटर
धावण्याच्या स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धांचेही औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार
जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरने पथसंचलनात पहिला क्रमांक पटकाविला, उपविभागीय कार्यालय
काटोल दुसऱ्या तर उपविभागीय कार्यालय उमरेड तिसऱ्या स्थानावर राहिले.
हिंगणा
नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत
ही स्पर्धा चालणार आहे.
००००
No comments:
Post a Comment