Wednesday, 22 January 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 




        नागपूर, दि.२३ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते तथा आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक व सिद्धहस्त प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. 

       

           आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment