नागपूर दि. 18 : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर येथील विधान भवन परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, विधानमंडळाचे सचिव यु. के. चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानभवन परिसरात प्रा. मोहन चव्हाण, दिलीपकुमार राठोड, पोलिस सहआयुक्त एस. रस्तोगी, पोलिस उपायुक्त रविंद्रसिंह परदेशी, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त रिना जनबंधू, उपायुक्त रमेश आडे, मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment