नागपूर दि. 11 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “जलयुक्त शिवार” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चांगला परिमाण आज सर्वत्र दिसून येत आहे. या अभियानाने प्रेरित होऊन सेन्ट्रल एक्साईज कार्यालयाचे अधिक्षक रमेश थोटे यांनी आज रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांच्या वतीने 50 हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.
रमेश थोटे यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली. जलयुक्त शिवार या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. अधिक्षक रमेश थोटे यांच्यापासून समाजबांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले .
00000
No comments:
Post a Comment