Sunday, 11 September 2016

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करा --- मुख्यमंत्री

  • विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

नागपूर दि. 10 :- गणेशोत्सव हा यावर्षी जन्मसिद्ध स्वराज्याचा सिंहगर्जनेचे शतक म्हणून लोकमान्य उत्सव संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्वांनी उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेऊन सार्वजनिक गणेश मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.
बजाज नगर येथील युवक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनंत धोटे, संजय अदमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करुन मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी माधव कोकडे, आनंद माखनकर, श्रीकांत सुटे, विजय मांजरेकर आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गोपालनगर, गणेश उत्सव मंडळ तसेच राजे संभाजी गणेश उत्सव मंडळास भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन महाजन, योगेश खापे, श्रीकांत ढोक आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाला 25 हजार रुपये
 भेंडे लेआऊट येथे श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळातर्फे पंचतत्व हेच जीवन तत्व आहे या आधारावर आर्कषक सजावट केली असून मोठ्या प्रमाणात भाविक या उत्सवात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल गणेश उत्सव मंडळात भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ईश्वर ढेंगळे, उपाध्यक्ष महेश गुडदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जलयुक्त शिवार अभियानासाठी मंडळातर्फे 25 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी मंडळाचे दीपक चोपडे, राजेश राऊत, निलेश राऊत, मदन कर्निक आदी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, बेटी बचाव बेटी बडाओ, प्रदूर्षण निर्मूलनासाठी लोकजागर, वृक्षारोपन, सार्वजनिक स्वच्छता मोहीम आदी विषयावर लोकजागृतीपर सचित्र देखावे तयार करण्यात आले असून जनतेमध्ये या माध्यमातून जागृती निर्माण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्डे लेआऊट येथील रिद्धीसिद्धी गणेश उत्सव मंडळ, खामला येथील बाल गणेश उत्सव मंडळ तसेच जयताळा त्रिमृतीनगर, लक्ष्मीनगर आदी सार्वजनिक तसेच वैयक्तिक गणेश उत्सवात सहभागी झाले.
** * * * **

No comments:

Post a Comment