Sunday, 9 October 2016

अडीच हजार कुटूंबांना भेटून प्रश्न समजवून घेणार आदर्श फेटरी ग्रामस्थांशी अमृता फडणवीसांचा सवांद





  • आदर्श ग्राम विकासाचा आढावा
  • अडीच लाख कुटूंबांच्या वैयक्तिक आरोग्य पत्रिका
  • पायाभूत सुविधासह महिलांसाठी प्रशिक्षण
  • योग प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ

नागपूर, दि.7 : आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावाचा विकास करतांना गावातील दोन हजार 650 कुटूंबांना भेटून त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी थेट संवाद साधणार असून महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन वैयक्तिक आरोग्य पत्रिका तयार करण्यात येईल. महिलांना व युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी आयोजित प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा, प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज फेटरी ग्रामवासियांशी संवाद साधतांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार आदर्श गाव म्हणून फेटरीची निवड केली असून फेटरीच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास कामांचा आढावा तसेच प्राथमिक शाळेत योग अभ्यास प्रशिक्षणाचे उद्घाटन व मॅमोग्राफी मशिनद्वारे महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आदी उपक्रमाचा शुभारंभ श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार समीर मेघे, पंचायत समितीच्या सभापती नम्रता राऊत, सरपंच श्रीमती ज्योती राऊत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फेटरी हे आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी कृती आराखडयानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून आरोग्य उपक्रेंद्र, प्राथमिक शाळा, तसेच गावातील विविध आवश्यक सुविधाची कामे लवकरच पूर्ण होत असल्याचे सांगतांना श्रीमती फडणवीस पुढे म्हणाल्या की, 50 कुटूंबांसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करुन प्रत्येक कुटूंबांचे प्रश्न समाजावून घेतल्या जाईल. त्यानंतर सर्वांचे एकत्र प्रश्न सोडविण्यात येतील. महिलांना व्यवसायासाठी प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येईल. त्यानुसार प्रशिक्षण घेऊन चांगले उत्पादन केल्यास त्यांच्या विक्रीचीही व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
योग प्रशिक्षणाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी चांगले आरोग्य असून यासाठी चांगला आहार तसेच नियमित योग आवश्यक आहे. मानसिक तणाव तसेच स्पर्धेसाठी योग प्रशिक्षण आवश्यक असल्याचे श्रीमती अमृता फडणवीस यांनी सांगितले. योगासन शिकविण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध असून नियमित योग करा असा संदेशही त्यांनी दिला.
आरोगय उपकेंद्र, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन, वेडींग मशीन बसविण्यात आले असून महिलांनी या सुविधेचा लाभ घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. आरोग्य उपक्रेंदात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील . तसेच आरोग्य केंद्रात बाळपण झालेल्या सविता महेशबन या मातेची व बाळाच्या प्रकुतीची आस्थेने चौकशी केली.
मॅमोग्राफीद्वारे महिलांची कर्करोग तपासणी
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व रोटरी कलब गांधी सिटीद्वारे महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी मोबाईल व्हॅन फेटरी या गावात सुरु करण्यात आली आहे. 65 महिलांनी मॅमोग्राफीद्वारे कॅन्सर तपासणी करुन घेतली असून या सुविधेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकास कामाचा आढावा घेतांना आरोग्य उपकेंद्रात टेली मेडिसिनची सुविधा तसेच ई लर्निंग व ई कलॉसची सुविधा सिस्को कंपनीद्वारे करण्यात येत असून मुलांसाठी संगणक प्रशिक्षण व ई लॉयब्ररीची सुविधा सुरु होत आहे. ग्रामविकासाच्या आराखडयाचे अमलबजावणी करतांना स्वयंसेवी संस्था व उद्योजकांकडून जास्तीत जास्त प्रकल्प कसे राबविता येईल, ग्रामस्थांना शेती, उद्योग, पशुपालन आदी व्यवसायासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.
आमदार समीर मेघे यांनी फेटरीच्या सर्वांगिन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाचे प्रत्यक्ष अमलबजावणीची सुरुवात झाली असून विकास कामे निर्धारित वेळत पूर्ण करण्यात येईल असे यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण यांनी फेटरी विकास आराखडया संदर्भात माहिती दिली.
00000000

No comments:

Post a Comment