नागपूर, दि.9: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ व कामांक्षी देवीची प्रतिकृती देवून स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजेश पुरोहित, राकेश पुरोहित, प्राचार्य राजेश पांडे व सचिव गोविंदलाल अग्रवाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील रामदेवजीबाबा मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रामदेवजीबाबा यांचे दर्शन घेतले.
*****
No comments:
Post a Comment