नागपूर, दि. 15 : कळमेश्वर नगर पालिकेने 6 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून तलाव व बगीच्याचे उत्कृष्ट सौंदर्यीकरण करुन नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून शहाराच्या सौदर्यात लवकरच जलतरण तलावाची भर पडणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कळमेश्वर नगर पालिकेच्या माध्यमातून वैशिष्ट्येपूर्ण कामेअंतर्गत जलतरण केंद्र, बाह्य रस्ता दुतर्फा फुटपाथ व बगीचा सौंदर्यीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते तर प्रमुख अतिथी खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुनिल केदार, गिरीश व्यास, आशिष देशमुख, सुधीर पारवे, नगरपालिकेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई श्रोते, उपाध्यक्ष कृष्णाजी गावंडे, मुख्य अधिकारी विद्याधर अंधारे, डॉ.राजीव पोतदार, राजेंद्र हरणे, चंदुजी उके, श्रीमती कल्पना फुलारे, सुरेखा श्रीखंडे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नगर परिषदेच्या विविध विकास कामांतून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत असून नगरपरिषदेच्या माध्यमातून चांगले रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी आदि सुविधा उत्तम प्रतीच्या दिल्या जात असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेचे विशेष कौतुक केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कळमेश्वर नगरपालिकेने शहाराच्या विकासासाठी विविध विकासकामांवर भर दिला आहे. भविष्यात कळमेश्वर नगरपालिका नागरिकांना चांगल्या प्रतीची सेवा देण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
** * * * **
No comments:
Post a Comment