2 व्या जायंट्स आंतरराष्ट्रीय अधिवेशनचे उद्घाटन
नागपूर, दि. 17 : देशभक्ती आणि सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन जायंट्स परिवार काम करीत आहे. सामाजिक सेवेसाठी आपल्या देशातही इतकी मोठी संघटना उभी राहू शकते हे जायंट्सने सिद्ध केले असून असेच सामाजिक सेवेचे व्रत जायंट्सने पुढे चालू ठेवावे असे प्रतीपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
हेडगेवार स्मृती स्मारक येथे महर्षी व्यास सभागृहात जायंट्स च्या 42 व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन चे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पार पडले ,यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी, जायंट्स च्या जागतिक अध्यक्ष शायना एन सी, दिनशा चे अध्यक्ष एस बापुना, तसेच जायंट्स चे पदाधिकारी उपस्थित होते.

जायंट्स ने बेटी बचाव, स्वच्छ भारत, मुलींसाठी शौचालय, अवयव दान, नेत्रदान, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांसाठी काम अशा अनेक सामाजिक विषयांवर काम केले आहे. या अभियानाला देशहित आणि समाज हितासाठी आणखी भव्य रूप द्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीड लाख पेक्षा जास्त सामाजिक काम सहकार्यवाह भैयाजी जोशी सांभाळतात. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला निश्चितच आज आणखी प्रेरणा मिळेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
देशात एकीकडे संपन्नता आहे तर दुसरीकडे गरिबी. आजही 35 कोटी जनता दारिद्रय रेषेखाली आहे. या दोन प्रकारच्या व्यवस्थेमधील सेतू बनण्याचे काम जायंट्स सारख्या संघटना करीत आहेत. हे काम संवेदना, निष्ठा, प्रामाणिकता, आणि कर्तव्य भावनेतून करावे. भारत देश विश्वाचे मार्गदर्शन करणारा देश होईल इतके सामर्थ्यशाली बनवण्यासाठी सर्वानी सहकार्याने काम करण्याची गरज असल्याचे भैयाजी जोशी यांनी यावेळी प्रतिपादित केले.

****
No comments:
Post a Comment