वृत्त विशेष क्रं. 1
दिनांक 31.12.2016
दिनांक 31.12.2016
शहरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सर्व सुविधासह पक्के घर असायला हवे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरात ज्या कुटुंबाकडे राहायला घर नाहीत अशा कुटुंबांसाठी नागपूर सुधार प्रन्यास, म्हाडा व महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 50 हजार घरकुले बांधण्यात येणार आहेत. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. शहरामध्ये रोजगार व व्यवसायासाठी येणाऱ्या कुटुंबांची लोकसंख्या व ज्यांच्याकडे हक्काचे घर नाही. अशा कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना एक आशेचा किरण ठरत आह. शहरातील ज्या कुटुंबाकडे राहायला घर नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न कुटुंबातील लोकांकरिता स्वस्त दरामध्ये घरे उपलब्ध करुन देणे हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर शहरात 50 हजार घरकुलाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नागपूर सुधार प्रन्यास 5 हजार घरकुले व म्हाडातर्फे 758 घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. ही योजना संपूर्ण शहरात टप्या-टप्प्याने राबविण्यात येत असल्यामुळे बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.
सर्वांसाठी घरे या संकल्पनेंतर्गत वाठोडा येथे 308 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुलांचा कार्यक्रम राबविण्यात येत असून हा प्रकल्प 36.24 कोटी रुपयांचा आहे. तसेच मौजा वांजरी येथील 2.453 हेक्टर जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 93.52 कोटी रुपये खर्च करुन 960 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला राज्याची तसेच संनियत्रण समितीची मंजुरी मिळाल्यामुळे घरकुलाचे स्पप्न पूर्णत्वास येत आहे.
हक्काचे घर असावे ही सर्वांचीच ईच्छा आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही हक्काचे घरकुल मिळवून देणारी योजना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबविणे आवश्यक असल्यामुळे भविष्यातील घरकुल योजनांचे नियोजन करण्यात आले आहे. मौजा तरोडी येथे 14.77 हेक्टर जागेवर 4 हजार 720 गाळे बांधण्यात येणार आहेत. वांजरी येथे 16 हेक्टरवर 5 हजार 142 गाळे, जयताळा येथे 3.56 हेक्टरवर 1 हजार 139 गाळे तसेच भरतवाडा व पूणापूर येथे 13.11 हेक्टरवर 4 हजार 195 गाळे बांधण्यात येणार आहेत.
लाभार्थ्यांची पात्रता
नागपूर सुधार प्रन्यासद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना परवडनारी घरे देण्याचा महत्वकांक्षी योजनेनुसार दहा हजार गरिब कुटुंबांकरिता घरे बांधण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. या नियोजनानुसार निविदा प्रक्रिया जागतिक निविदा आमंत्रित करण्यात आल्या असून या निविदा खुल्या तंत्रज्ञानाच्या आहेत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील घरकुले बांधण्याच्या योजनेचे आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांमध्ये पती, पत्नी व अविवाहीत मुलांचा समावेश असून लाभार्थी कुटुंबांजवळ त्याच्या नावावर अथवा त्याच्या कुटुंबांमध्ये कोणत्याही सदस्याच्या नावे देशाच्या कुठल्याही भागामध्ये पक्के घर नसलेल्या व्यक्तीचा समावेश राहणार आहे. या इमारतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांकरिता 30.00 चौ.मि. व अल्प उत्पन्न गटातील लोकांकरिता 60.00 चौ.मि.चे चटई क्षेत्रफळ आहेत. यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लक्ष रुपयाच्या आत व अल्प उत्पन्न गटातील वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लक्ष रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींकरिता केंद्र शासनाकडून दीड लक्ष रुपये प्रति घरकुल, राज्य शासनाकडून एक लक्ष रुपये प्रति घरकुल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार असून उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे.
अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी सवलतीच्या दरावर बाजारभावापेक्षा 6.50 टक्के कमी दराने 15 वर्षाकरिता बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु ही सवलत 6 लक्ष रुपयापर्यंत अनुज्ञेय आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन घ्यावी लागेल.
19 हजार लाभार्थ्यांची यादी तयार
महानगर पालिकेद्वारे 22 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2016 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून 19 हजार 016 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जाची पडताळणी करुन पात्र असल्यालांना भरपूर लाभ मिळणार आहे.
घरकुल योजनेतील गाळे वाटपासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचा जमीन विनियोग मधील तरतूदीनुसार 30 वर्ष मुदतीच्या स्थायी पट्टयावर सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. प्रचलित नियमानुसार नुतनीकरण करुन देण्यात येणार आहे.
घरकुल बांधण्याकरिता बीएमपीटीसी या मान्यताप्राप्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या घरकुलामध्ये सभोवतालच्या परिसराच्या विकासाची कामे, कम्युनिटी सेंटर, नित्यउपयोगी वस्तूंचे दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यकता असल्यास स्वतंत्र मल निस्सारण व्यवस्था, रस्ते, पार्कींग, मिटर रुम, विद्युतीकरण, सौर उर्ज्जेवर चालणारी पथ दिवे, कंपाउंड वॉल इत्यादी बाबींचा समावेश आहे. सौर उर्जेद्वारे उत्पन्न होणारे विजेचा वापर करुन विद्युतीकरणाचा खर्च कमी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामध्ये तळमजला व चार मजले असून गाळ्यामध्ये बेडरुम किचन, हॉल तसेच बालकनीचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा मार्गदर्शक तत्वानुसार सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित घरकुलांची योजना नागपूर शहरात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्यामुळे स्वत:चे घर नसलेल्यांना हक्काचे घर मिळणार आहे.
अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी
9890157788
** * * * **
No comments:
Post a Comment