Tuesday, 10 January 2017

सर्व प्रमाणपत्र मिळणार आता घरपोच जिल्हाधिकाऱ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

2 जानेवारीपासून योजनेची सुरुवात

नागपूर, दि. 31 :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्रामधून जनतेला आवश्यक असणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारा विलंब टाळतांनाच  अर्जदाराच्या मागणीनुसार घरपोच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदाराला भरावयाच्या शुल्का व्यतिरिक्त केवळ 15 रुपये  जमा करावे लागणार आहेत.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सेतू विभागामार्फत दिल्या जाणारे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी सेतू केंद्रात जाऊन घ्यावे लागत होते. परंतु नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 2 जानेवारीपासून घरपोच उपलब्ध करुन देण्याच्या योजनेची सुरुवात होत आहे. प्रारंभी नागपूर शहरात  दोन महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर घरपोच सेवा देण्यात येणार आहे.
घरपोच प्रमाणपत्र हवे असल्यास अर्जदारास सादर करावयाच्या शुल्का व्यतिरिक्त  15 रुपये अतिरिक्त जमा करावी लागणार आहेत. त्यानंतर अर्जदारास विहित कालावधीच्या आत प्रमाणपत्र द्वारपोच पोहचविण्याची व्यवस्था जिल्हा सेतू केंद्राकडून करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तसेच योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment