Tuesday, 10 January 2017

माध्यमातील बदलांचा पत्रकारांनी वेध घ्यावा --- राधाकृष्ण मुळी


दर्पण दिन जिल्हा माहिती कार्यालयात साजरा
नागपूर, दि. 06 :  बदलत्या माहिती तंत्रज्ञानानुसार वृत्तपत्रासह विविध माध्यमातील तंत्रज्ञान बदलत आहे. पत्रकारांनी या सकारात्मक बदलाचा स्वीकार करुन स्वत:लाही या बदलाशी जुळवून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. मुळी बोलत होते.
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप हिवळकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर श्रीखंडे, विराग पाचपोर, उन्मेश पवार, सुभाष वऱ्हाडे, श्री. धानोरकर आदी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
मराठी वृत्तपत्राची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केली असून त्याची विश्वासार्हता आजही कायम आहे. बदलत्या काळानुरुप माहिती व तंत्रज्ञानाचा नवनवीन अविष्कारामुळे  पत्रकारातीमध्ये कामाचा वेग वाढला असल्याचे श्री. मुळी यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
00000000

No comments:

Post a Comment