नागपूर, दि. 05 : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक 3 फेब्रुवारी 2017 रोजी होत आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनूप कुमार यांनी आज दिली.
निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेलया शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारीला प्रसिध्द करण्यात येईल. तर 17 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 18 जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होईल आणि 20 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करता येईल. 6 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झाल्याने नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती यावेळी दिली.
34 हजार 802 मतदार
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2016 या अहर्ता दिनांकानुसार 34 हजार 802 शिक्षक मतदार आहेत. यामध्ये नागपूर जिल्हयात 14 हजार 821, वर्धा 4 हजार 229, भंडारा 3 हजार 692, चंद्रपूर 5 हजार 721, गोंदिया 3 हजार 305 तर गडचिरोली जिल्हयातील 3 हजार 34 शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 95 मतदान केंद्रे राहणार आहेत. यामध्ये नागपूर जिल्हयातील 43 मतदान केंद्रांचा समावेश असून भंडारा जिल्हयात 12, गोंदिया जिल्हयात 10, वर्धा जिल्हयात 14, चंद्रपूर जिल्हयात 27, तर गडचिरोली जिल्हयातील 18 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी प्रशासनातर्फे आवश्यक तयारी सुरु असून जिल्हाधिकारी हे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहायक निवडणूक अधिकारी आहेत.
असा आहे कार्यक्रम
अ.क्र.
|
कार्यक्रम
|
दिवस आणि तारीख
|
1
|
अधिसूचना प्रसिध्दी
|
10 जानेवारी 2017 (मंगळवार)
|
2
|
नामनिर्देशनाचा अंतिम दिनांक
|
17 जानेवारी 2017 (मंगळवार)
|
3
|
नामनिर्देशन छाननी
|
18 जानेवारी 2017 (बुधवार)
|
4
|
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
|
20 जानेवारी 2017 (शुक्रवार)
|
5
|
निवडणूक
|
3 फेब्रुवारी 2017 (शुक्रवार)
|
6
|
निवडणुकीची वेळ
|
सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
|
7
|
मतमोजणी दिनांक
|
6 फेब्रुवारी 2017
|
8
|
निवडणुक प्रक्रिया समाप्ती
|
9 फेब्रुवारी 2017
|
No comments:
Post a Comment