Friday, 31 March 2017

कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय नामकरण

  • कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई, दि. 29 : कोल्हापूर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, कोल्हापूर या महाविद्यालयाचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर असे करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विशेष प्रयत्न केले होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे समाजसुधारक होते. समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा विचार करुन या महाविद्यालयाचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर असे केले आहे, असेही श्री. खोत यांनी या निर्णयानंतर सांगितले.
०००००

No comments:

Post a Comment