Saturday, 1 April 2017

सोमवारी लोकशाही दिन जिल्हाधिकारी जनतेची गाऱ्हाणी ऐकणार

नागपूर, दि.01 :   लोकशाही दिन सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे लोकशाही दिनात जनतेच्या गऱ्हाणी ऐकतील. तसेच तक्रारी स्विकारतील.
लोकशाही दिनात तक्रारदाराला आपला अर्ज वैयक्तिक स्वरुपात सादर करायचा असून हा अर्ज दोन प्रतीत असणे आवश्यक आहे. तक्रार ही वैयक्तिक स्वरुपात असावी.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करण्यापूर्वी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्ज सादर करावा. या अर्जावर एक महिना कार्यवाही झाली नसेल तरच जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन सादर करावेत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाचा टोकण क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांचे स्तरावर स्वतंत्र लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे या संबंधी तक्रारी संबंधित लोकशाही दिनात सादर कराव्यात.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपील प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रिये अंतभाव असलेली प्रकरणे, सेवा विषयक व नोकरी विषयक, आस्थापना विषयक प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

00000000

No comments:

Post a Comment