नागपूर, दि.01 : उपजिल्हाधिकारी गिरीश मनोहर जोशी हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ महसूल सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गिरीश जोशी यांचा सेवेचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून गौरव केला.
बचतभवन सभागृहात आयोजित निरोप समारंभात निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, श्रीमती मनिषा जायभाय, रविद्र खजांगी, लिना फलके, शिरीष पांडे आदी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थ्िातीत होते.
महूसल सेवेत कार्यरत असताना गिरीश जोशी यांनी सामान्य जनतेला सहज व सूलभ सेवा देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महसूल प्रशासनामध्ये श्री जोशी यांनी दिलेल्या सेवेचा गौरव केला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, श्रीमती मनिषा जायभाय, शिरीष पांडे यांनी निरोप समारंभात गिरीश जोशी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. गिरीश जोशी यांनी महसूल सेवेमध्ये 31 वर्ष केलेल्या विभागातील विविध जिल्हयातील आठवणी सांगितल्या. तसेच सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल सेवेमध्ये नायब तहसिलदार म्हणून 30 डिसेंबर 1985 रोजी श्री. गिरीश जोशी यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आदी विविध जिल्हयात विविध पदावर कार्यरत होते. म्हाडामध्ये सुध्दा त्यांनी नागपूर येथे यशस्वीपणे कार्य केले आहे.
00000000

No comments:
Post a Comment