19 दुकानांवर औषध उपलब्ध
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मार्गदर्शन केंद्र
नागपूर, दि.19 : स्वाईन फ्लू या आजाराबाबत जनतेने सतर्क राहून आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करावी. जिल्हयात स्वाईन फ्लू या रोगावरील औषधी 19 औषधी दुकानांवर उपलब्ध असून या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
स्वाईन फ्लू आजारासंदर्भात नागपूर शहरात रुग्ण आढळून आले असून या संदर्भात घ्यावयाची काळजी, तसेच औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे उपस्थित होते.
नागपूर शहरात तसेच जिल्हयात मागील महिन्यापासून स्वाईन फ्लू संदर्भात 44 रुग्णांचे स्वॅप (नमुने) घेण्यात आले त्यापैकी 41 रुग्णांचे नमुन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नागपूर शहर व जिल्हयातील सात रुग्ण दगावले असून अमरावती येथील 4, तर छिंदवाडा येथील 1 रुग्ण दगावल्यामुळे जनतेने स्वाईन फ्लूबाबत सतर्क राहून सर्दी, पडसा, खोकला आणि ताप असल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय मेयो येथे स्वाईन फ्लूच्या आजाराबाबत तपासणी करण्यात येते. तेथे तपासणी करुन घ्यावी अथवा सर्व शासकीय तसेच इतरही रुग्णालयात स्वॅप नमुने घेवून तपासणीसाठी पाठवावे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे यांनी यावेळी सांगितले.
स्वाईन फ्लू हा लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेहाचे रुग्णांमध्ये आढळून आल्याचे सांगतांना पहिल्या सात दिवसात विशेष खबरदारी घ्यावी व तपासणी करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. स्वाईन फ्लू आजारासाठी आवश्यक असलेल्या टॅम्बीफ्लू ही औषध जिल्हयातील 19 औषधी दुकानांमध्ये उपलब्ध आहे. औषधावरील एमआरपी पेक्षा अधिक रक्कम घेतल्या जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. स्वाईन संदर्भात मेयो हॉस्पीटल परिसरातील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 0712-275421 हा आहे. या दूरध्वनी क्रमांकावर या आजाराबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्हयातील अनुसूची एक मध्ये परवानाधारक औषध दुकानांमध्ये स्वाईन फ्लूची औषध उपलब्ध आहे. यामध्ये दंगा केअर फॉर्मसी, सिपला लिमिटेड वाडी नागपूर (डेपो), कुकरेजा ऐजन्सी गांधीबाग नागपर (थोक विक्रेता), निता ऐजन्सी गांधीबाग नागपूर, हेटरो डर्ग्स (डेपो), अबोट व्हॅक्सीन (डेपो), किरकोळ विक्रत्यांमध्ये कमल मेडिकल ॲण्ड जनरल स्ट्रोर खामला नागपूर, श्री मेडिकल ॲण्ड जनरल स्ट्रोर वर्धा रोड, बॉम्बे मेडिकोज धंतोली, म्युर मेमोरियल हॉस्पीटल ॲण्ड जनरल स्ट्रोर सीताबर्डी, तारा न्युरो धंतोली, वसंत मेडिकल स्टोर रामदासपेठ, बॉम्बे मडिकल स्टोर सिताबर्डी, जयअंबे मेडिकल ॲण्ड जनरल स्टोर जलालखेडा (नरखेड), लता मंगेशकर डिगडोह, सिचन मेडिकोज प्रातपनगर, वोकहार्ट मेडिकल आणि जयझुले मेडिकोज या दुकानांवर औषध उपलब्धआहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, तसेच ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू आजारावरील औषध आरोग्य विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
00000000
No comments:
Post a Comment