नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नुकतीच पार पडली. यावेळी मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. प्रमोद येवले, सुधीर ठाकरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग माधव झोड उपस्थित होते.
निवेदने, प्रस्ताव सादर केलेल्या संघटना, जातीसमूह यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना परिपूर्ण प्रस्ताव बैठकीत किमान 500 लोकांचे करारनामा ज्या जिल्ह्यामध्ये ती जात आहे त्या सर्व जिल्ह्यातील लोकांचा त्यात समावेश करून अशा प्रकारची सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे 15 मे 2017 पर्यंत राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचेकडे सादर करण्यास आयोगाच्या सदस्यांनी सांगितले. त्यानंतर विविध संघटनेने आयोगापढे निवेदनाच्या माध्यमातून समस्या मांडल्या.
मस्जिद उस्मानिया चुनावाला चुनेवाले, चुनगर, चुनावाला या जातीला इतर मागासवर्ग समूहामध्ये तर किराड या जातीचा समावेश भटक्या जमातीच्या यादीत करण्याबाबत संघटनेने निवेदन दिले.
बैठकीला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त आर. डी. आत्राम, वर्धेचे सुरेंद्र पवार, गडचिरोली राजेश पांडे, यवतमाळचे किशोर भोयर उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment