नागपूर, दि. 20 : शासकीय वाहनावरील लाल आणि अन्य दिवे काढून टाकण्याचे केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निर्धारित दिवसाची (1 मे) वाट न बघता आपल्या वाहनावरील अंबर दिवा काढून तो राजशिष्टाचार विभागाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य जनतेला शासनाबद्दल कायम आपलेपणा वाटावा तसेच अति विशिष्ट व्यक्ती म्हणून असणारी दरी दूर व्हावी, यादृष्टीने वाहनावर असलेला लाल अथवा इतर दिवे काढून जनतेसाठी शासन ही संकल्पना रुढ व्हावी, यादृष्टीने वाहनावरील दिवे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी 1 मे पासून होणाऱ्या अंमलबजावणीची वाट न पाहता आज सकाळी अंबर दिवा काढण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाची ओळख हीच त्यांच्या वाहनावरील दिव्यामुळे न होता कामामुळे होणार असल्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांनीही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा न करता वाहनावरील दिवे काढून दैनंदिन काम करावे, असेही विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी या निर्णयाचे स्वागत करतांना सांगितले.
*******
No comments:
Post a Comment