Monday, 31 July 2017

नवीन 10 परिभाषा कोश निर्मितीसाठी उपसमित्या स्थापन



मुंबई, दि. 31 : भाषा संचालनालयामार्फत नवीन 10 परिभाषा कोश निर्मिती करण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आली आहे.
कृषि अभियांत्रिकी परिभाषा कोश उपसमितीसूक्ष्मजीवशास्त्र परिभाषा कोश उपसमितीसंगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान परिभाषा कोश उपसमितीजल व भूमी व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमितीसागर विज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमितीयोगशास्त्र परिभाषा कोश उपसमितीआहारशास्त्र परिभाषा कोश उपसमितीजैवतंत्रज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमितीजनसंवाद परिभाषा कोश उपसमितीआपत्ती व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमिती अशा 10 परिभाषा 10 कोश निर्मिती करण्यात येणार आहे.
वरील विषयांकरिता नेमलेल्या उपसमित्यांवर विदयापीठांच्या / संस्थांच्या/ मंडळाच्या प्रतिनिधींच्या नेमणुकीच प्राधिकार भाषा संचालनालयाचे भाषा संचालक यांना देण्यात आले आहेत.वरील सर्व उपसमित्यांच्या मुदत एका वर्षासाठी राहील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201706191621201433 असा आहे.
००००

No comments:

Post a Comment