मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून या संस्थेत महाराष्ट्र राज्यातील आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी या विद्यार्थ्यांना वार्षिक 20 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती त्यात आता 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून ही शिष्यवृत्तीची रक्कम आता 40 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. सदर वाढीव शिष्यवृत्तीचा लाभ जानेवारी 2017 च्या सत्रापासून प्रवेश घेतलेल्या तसेच या संस्थेत शिक्षण पुढे चालू ठेवलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201707251543593121 असा आहे.
०००
No comments:
Post a Comment