Monday, 31 July 2017

विधानपरिषद इतर कामकाज : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासाठी केंद्राला विनंती करणार - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर


मुंबई, दि. 31 : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासन काळजी घेणार असून पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती केली असून आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष भेटून विनंती मान्य झाल्यास याबाबत निर्णय आज जाहीर करु, अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
श्री. फुंडकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्राची योजना असून गेल्या वर्षी एक कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या वर्षीही अंतिम दिनांकापर्यंत आलेल्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुदतवाढ मिळाल्यास जुन्या निकषांनुसारच लाभ मिळेल. पीक विमा अर्ज भरण्यासाठी रांगेत उभा असणारा राम पोत्रे हा 35 वर्षीय शेतकरी चक्कर येऊन खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील मंचक इंगळे हा शेतकरी दुचाकी अपघातात दगावला. या घटनेचा पीक विमा लाभ घेण्याशी संबंध आहे काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
विधानपरिषदेत सदस्य धनंजय मुंडे यांनी 289 अंतर्गत प्रस्ताव मांडला होता.
००००

No comments:

Post a Comment