नागपूर , दि 29 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च 2018 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( बारावी) ची बर्हि:शाल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याकरिता 17 नंबरचा अर्ज भरणे अनिवार्य आहे. दिनांक 31 जुलै 2017 ते 21 ऑगस्ट 2017 या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरावयाचे आहे. त्याकरिता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर जावून मराठी किंवा इंग्रजीमधून अर्ज सादर करावा, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment