मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘स्वाईन फ्लू आजार आणि उपचार’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
राज्यात स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत असलेली खबरदारी ,स्वाईन फ्लूवरील औषध आणि इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का ? अति जोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण, बाईक ॲम्बुलन्सची सेवा, अवयवदान आदी संदर्भात सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment