नागपूर, दि.28 : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी अशोक ऊर्फ छोटू
शामराव बुरलेच्या मृत्यूची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांच्यामार्फत करण्याचे आदेश
जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहे.
अशोक बुरलेचा 27
जुलै 2016 रोजी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृतकाच्या
मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा
या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व
माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय,
नागपूर येथील खोली क्र.1 मध्ये 11 सप्टेंबर 2017 पर्यंत किंवा त्यापूर्वी सादर
करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment