मुंबई, दि. 1 : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- 400001 यांच्याकडे 18 सप्टेंबर पर्यंत सादर करावा. विहित अर्जाचा नमुना आणि योजनेबाबतचा अधिकचा तपशील शासन निर्णय क्रंमाक अविवि-2010/प्र.क्रृ152/10/का.6 दिनांक 11 ऑक्टोबर 2013 आणि महाराष्ट्र शासनाच्या http://mdd.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
No comments:
Post a Comment