Friday, 1 September 2017

मत्स्यव्यवसायाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


मुंबईदि. 1 : राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत खेकडाकालवे व शिंपले संवर्धन करण्याकरिता प्रकल्पांसाठी 50 टक्के अनुदान मत्स्य व्यवसाय विभागामार्फत अर्थसहाय्य देण्यात येते. या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी कोकण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसायदुसरा मजलाप्रशासकीय इमारतबांद्रा (पूर्व) 022- 26553279, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय,सातवा मजलाप्रशासकीय इमारतबांद्रा (पूर्व) 022-26551996, ठाणे/पालघरचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायरॉयल पॉईंट 2, जुना तळवळकर हॉलकचेरी रोडपालघर (पश्चिम) 02525-252215,254549,रायगडचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायतिसरा मजलासिद्धी अपार्टमेंटपेण रोडअलिबाग, 02141- 2224221, 222037, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायपरटवणेमिऱ्या हायवे रोडपालकर हॉस्पिटलच्या मागेरत्नागिरी, 02353- 233726, सिंधुदूर्गचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायझांटये बिल्डिंगसोमवार पेठमालवण (जि. सिंधुदूर्ग) 02365- 252007 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

No comments:

Post a Comment