Thursday, 28 September 2017

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक संस्थांना आवाहन


नागपूर, दि. 28 :  61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येत्या 30 सप्टेंबर रोजी देशभरातील तसेच विदेशातील अनुयायी मोठ्या संख्येने नागपूर येथील दीक्षाभूमीवर वंदन करण्यासाठी भेट देतील. त्यांना निवाऱ्याची आणि जेवणाची सुविधा, शहरातील रस्त्यांची माहिती व बस सेवा, रेल्वेचे वेळापत्रक देखील उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निर्धन रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दरात उपचार करणाऱ्या नागपूर शहरातील हॉस्पिटलची यादी  charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी महाराष्ट्र न्यास नोंदणी  अधिनियमांतर्गत नागपूर शहरात व नागपूर जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सर्व न्यासांनी व सामाजिक संस्थांनी 30 सप्टेंबर रोजी 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे येणाऱ्या अनुयायांना आपल्या न्यासामार्फत अथवा संस्थेमार्फत योग्य ती मदत उपलब्ध करुन द्यावी तसेच या सामाजिक उपक्रमात आपला हातभार नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक धर्मदाय आयुक्त म. द. जोशी यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment