नागपूर, दि. 29 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील.
तक्रारकर्त्यांनी लोकशाही दिनात अर्ज विहित नमुन्यात सादर करावा, तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर कराव्यात, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची असावी तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यात त्यावर कारवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/ निवेदन सादर करावे. त्याकरिता तालुकास्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाचा टोकण क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment