नागपूर, दि. 29 : टाटा इन्स्िटट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेचे अणू ऊर्जा विभाग आणि भारतीय अवकाश संशोधन विभागातर्फे 15 नोव्हेंबर 2017 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत हैद्राबाद येथून दहा ‘बलून फ्लाईट’अवकाशात सोडण्यात येणार आहे. ‘बलून फ्लाईट’मध्ये संशोधनाकरिता आवश्यक वैज्ञानिक उपकरणे असणार आहे. बलून फ्लाईट 30 ते 42 कि.मी. उंचीवर गेल्यानंतर त्यातील वैज्ञानिक उपकरणे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर येणार आहे. पॅराशूट गावात किंवा शहरात जमिनीवर आढळून येतील. नागरिकांनी जमिनीवर आढळलेल्या ‘बलून फ्लाईट’ मधील उपकरणांशी छेडछाड न करता उपकरणे ज्या पॅकमध्ये असतील त्या पॅकवरील दूरध्वनी क्रमांकावर जवळच्या पोलिस स्टेशन, डाकघर अथवा जिल्हा प्रशासनाकडे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment