नागपूर दि. 30 :- उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2018 मध्ये
घेण्यात येणार आहे. या परीक्षेस नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित
शुल्कासह शनिवार दिनांक 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत व विलंब शुल्कासह
मंगळवार दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदपत्रे
भरावयाची आहे. शनिवार दिनांक 2 डिसेंबर ते सोमवार दिनांक 18 डिसेंबरपर्यंत कनिष्ठ
महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. शुल्क भरल्याच्या चलनासह
विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी कनिष्ठ
महाविद्यालयांनी जमा करावे, असे नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment