उमरेड येथे दिवाणी न्यायालय उद्घाटन
नागपूर, दि. 30 : उमरेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश
न्यायालय नव्याने निर्माण करण्यात आले आहे. या न्यायालयाचे उद्घाटन शनिवार, दिनांक 2
डिसेंबर रोजी उच्च न्यायलय मुंबईच्या
नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाचे
न्यायमूर्ती आर. बी. देव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे, वरिष्ठ पालक
न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित
राहण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी
पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment