Tuesday, 28 November 2017

हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर पासून सुरू - संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट



मुंबई, दि. २८ : नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०१७ रोजी सुरू होणार असून, ते शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०१७ पर्यंत कामकाज चालेल अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री. बापट म्हणालेया अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. पुरवणी नियोजन विधेयकास मंजुरी देण्यात येणार आहे.  गुरूवार दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होईल. 
कामकाज एकमताने व्हावे आणि अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा अशी शासनाची भूमिका आहे, असेही श्री. बापट यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment